🕒 1 min read
मुंबई: टोकयो ऑलिंपिकमध्ये भारतासाठी ट्रॅक अँड फील्डमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्रा याने इतिहास रचला होता. त्याचे संपूर्ण देशवासीयांनी कौतुक केले होते. मागेच गोल्डनबॉय नीरज चोप्राला एकाच दिवशी परम विशिष्ट सेवा मेडल आणि पद्मश्री हे दोन पुरस्कार जाहीर झाले होते. आता त्याला अजून एक मोठ्या पुरस्कारासाठी नामाकंन मिळाले आहे.
नीरज चोप्राला सर्वात मोठे क्रीडा पुरस्कार लॉरेस वर्ल्ड लॉरेस वर्ल्ड ब्रेक थ्रू ऑफ द ईयर अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाले आहे. नीरज चोप्राच्या स्पर्धेत या पुरस्कारासाठी जगभरातील मोठे मोठे खेळाडू आहेत. ज्यात एमा राडूकानू, नुकताच ऑस्ट्रेलियन ओपन फायनलिस्ट डॅनिल मेदवेदेव, पेद्री, युलिमार रोजास, एरियन टिटमस यांचा समावेश आहे. लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला नीरज चोप्रा तिसरा भारतीय खेळाडू आहे.
#BreakingNews ????
????????’s @Neeraj_chopra1 Gold medalist #Tokyo2020 @Olympics nominated for the #Laureus22 World Breakthrough Performance of the Year Award ????
Neeraj is only the 3rd Indian athlete to be nominated for a LAUREUS WORLD SPORTS AWARD
1/2#Athletics #NeerajChopra pic.twitter.com/RSY8tyABGI
— SAI Media (@Media_SAI) February 2, 2022
नीरज चोप्राच्या आधी माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि कुस्तीपटू विनेश फोगटलाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स दरवर्षी दिला जातो. वर्षात अनन्यसाधारण कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि संघाना हा पुरस्कार दिला जातो. लॉरियस स्पोर्ट फॉर गुड फाऊंडेशनचे संस्थापक डेमलर आणि रिचेमॉन्ट यांनी १९९९ मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांचा मोठा खुलासा; म्हणाले, “अनिल परब द्यायचे पोलीस बदल्यांची यादी”
- समय बडा बलवान है | इंसान खामोखा गुरूर करता है|
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळ खेळवणार डे अँड नाईट टेस्ट
- ‘तीन कोटी गरीब लखपती झाले’; अर्थसंकल्पानंतर मोदींचे वक्तव्य
- मोदी सरकार महिला विरोधी असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पातून पुन्हा सिद्ध झाले; महिला काँग्रेसची टिका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
