Share

‘राजे’ तुमच्या विचारांचे पालन करणार, चिमुकल्यांचा शिवजयंती दिनी निर्धार

Published On: 

औरंगाबाद : शहरात यंदा कोरोनाचे सावट शिव जयंती वर दिसून येत आहे. सरकारने गर्दी न करण्याचे फर्मान शिवप्रेमींसमोर ठेवले आहे. त्यातच अनेक शिवप्रेमींनी शिव जन्मोत्सव आपल्या घरातच साजरा केला आहे. गुलमंडी वरील एका अपार्टमेंट मध्ये शिव जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी किमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पालन करण्याचा निर्धार केला.

दरवर्षी प्रमाणे शिव जयंती उत्साहात साजरी होत आहे. यंदा मात्र सार्वजनिक कार्यक्रमावर सरकारने निर्बंध आणले आहे. त्यामुळे शिव प्रेमी जयंती घरीच साजरी करण्यावर भर देत आहे. गुलमंडी वरील एका अपार्टमेंट मध्ये शिव जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला चिमुकल्यांच्या हस्ते पुष्पहार घालून, प्रतिमेची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी चिमुकल्यांनी मावळ्यांचा वेश परिधान केला होता.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज आहे. त्यांनी केलेल्या कार्याची शिकवण आम्हाला मिळत आहे. आम्ही देखील त्यांच्या विचारांचे पालन करत, त्यांच्या विचारांसारखेच वागण्याचा निर्धार केला आहे. दुर्वा अक्षय साहुजी, नम्रता तांबे, अनुश्री तांबे, अंन्वित तांबे, मुक्ता तांबे या चिमुकल्यांसह पुष्पा गौतमसा साहुजी,अंकुश तांबे यांच्यासह अपार्टमेंट मधील रहिवाश्यांनी शिव जयंती साजरी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!