Share

बाबा रामदेव यांचा रामबाण उपाय;तीन दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होण्याचा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ्या संख्येने वाढ होऊ लागली आहे. अकोला आणि अमरावती हे जिल्हे तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागले आहेत. यवतमाळ जिल्हातही परिस्थिती वेगळी नाही आहे. राज्य सरकारकडून वेळोवेळी याबाबत नागरिकांना अलर्ट केलं जात आहे. याठिकाणी वाढणारी रुग्णसंख्या चिंतेत टाकणारी आहे.

राज्यातील एकूण ९ जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने प्रशासन पुन्हा हाय अलर्टवर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात कडक निर्बंधांचे संकेत देण्यात आले आहेत. रुग्ण वाढल्याने रत्नागिरीतील एक गाव कंन्टेंमेट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे

दरम्यान, हा धोका पुन्हा एकदा वाढू लागला असल्याने सर्वांच्या डोकेदुखीत वाढ होण्याची चिने असताना योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी या औषधाची घोषणा केली.

बाबा रामदेव यांनी अशी घोषणा केली की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोव्हिडवर उपचार होतील. त्यांनी असा दावा केला आहे की आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली आहे.पतंजलीकडून असा दावा केला जात आहे की 70 टक्के रुग्ण तीन दिवसात या औषधाच्या वापरामुळे बरे होतील.

याआधी रामदेव बाबांनी कोरोनिलला केवळ रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठीचे बुस्टर म्हटले होते. आता रामदेव बाबांनी कोरोनिलला CoPP – WHO GMP च्या प्रोटोकॉल आणि सर्टिफिकेशन सिस्टमनुसार सहाय्यक औषध घोषित केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!