🕒 1 min read
चेन्नई : आयपीएलच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मैक्सवेल याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २ कोटी इतकी बेस प्राईज असलेल्या ग्लेन मैक्सवेल ला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रस्सीखेच चांगलीच रंगली होती. यानंतर, तब्बल १४.२५ कोटी रुपये इतक्या किंमतीवर त्याला खरेदी करण्यात आले.
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाने सर्वात जास्त १४.२५ कोटी रुपयांची बोली लावत ग्लेन मैक्सवेलला संघात घेतलं आहे. बेस प्राईज २ कोटी असलेल्या ग्लेन मैक्सवेलचं नशीब चांगलच फळफळल्याचं दिसून येत आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात मैक्सवेल पंजाबच्या संघाकडून खेळला होता. आता आगामी हंगामात तो आरसीबी कडून खेळताना दिसणार असल्याने फॅन्ससाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ग्लेन मैक्सवेलला संघात सामील करताच ग्लेन मैक्सवेलने ट्विट करून, ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सोबत खेळण्याची उत्सुकता दाखवली आहे. मी आता वाट बघू शकत नाही आपल्याला ट्रॉफी मिळवून देण्यासाठी’. मैक्सवेलने हे ट्विट करताच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने देखील ट्विटला उत्तर देत, ‘आम्ही देखील तुला मैदानात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासोबत पाहण्यास उत्सुक आहोत’.
Looking forward to joining @RCBTweets for this years @IPL
Can’t wait to put everything I have in to helping us lift the trophy!— Glenn Maxwell (@Gmaxi_32) February 18, 2021
Great to have you on board, and can’t wait to see you take off on the field, Maxi! ???????????????? #PlayBold #IPLAuction2021
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 18, 2021
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी ताटं वाजवायला लावून देशात अवदसा आणली – नाना पटोले
- पाण्याच्या टाकीत सापडले होते दोन सांगडे; 8 वर्षांनंतर अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
- राज्यात गारपीट, अवकाळी पाऊस; वीज पडून ६ ठार; शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान
- आरोग्यमंत्री राजेश टोपेंना कोरोनाची लागण
- ‘काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला’
- कोटीच्या कोटी उड्डाणे : टॉप-५ बोलींमध्ये भारताचा केवळ एक खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

