मुंबई : पुढील महिन्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट हे चिन्ह दिले. मात्र, हे चिन्ह बदलून देण्याची लेखी मागणी बिहारमधील शिवसेनेकडून आयोगास करण्यात आली असून आता आयोगाच्या निर्णयाची आता प्रतीक्षा आहे.
नितीशकुमार यांचा दनता दल हा युनायटेड हा पक्ष सत्तेत असून ‘बाण’ हे जदयूचे निवडणूक चिन्ह आहे. शिवसेनेचेही नेमके ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह असल्याने ऐन निवडणुकीत बाण की धनुष्यबाण असा मतदारांचा गोंधळ होतो आणि आमच्या हक्काची मते शिवसेनेला जातात, असा दावा मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी निवडणुक आयोगापुढे केला होता. शिवसेनेला धनुष्यबाण ही निशाणी देऊ नये, अशी मागणीही जदयूने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाणावर निवडणूक लढविता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, गॅस सिलिंडर वा बॅट यापैकी एका चिन्हाची मागणी शिवसेनेने आयोगाकडे केली होती. बिहार निवडणुकीत ही तिन्ही चिन्हे खुली आहेत. मात्र, आयोगाने शिवसेनेला बिस्किट चिन्ह दिले. मात्र, हे चिन्ह बदलून देण्याची लेखी मागणी बिहारमधील शिवसेनेकडून आयोगास करण्यात आली असून आता आयोगाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत एक टोमणा मारला आहे. अगदी योग्य निवडणूक चिन्ह दिलंय बिहार निवडणुकीसाठी….’पीडी’ और ‘बिस्कीट की खूप जमेगी जोडी… असं त्यांनी म्हटलं आहे.
अगदी योग्य निवडणूक चिन्ह दिलंय बिहार निवडणुकीसाठी….
'पीडी' और 'बिस्कीट की खूप जमेगी जोडी… ????— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 10, 2020
बिस्किट मिळालं
आता मतदार चॉकलेट देतीलच.#चाय_बिस्कीटhttps://t.co/OOuOYKS1p2— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) October 10, 2020
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल जाहिर होणार आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. बिहार विधानसभेत एकूण 243 मतदारसंघ असून बिहारमध्ये किमान 50 जागा लढविण्याचा शिवसेनेचा विचार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- किस्से राजकारणातले : उच्चस्तरीय चर्चा करण्यासाठी ‘गोदरेज कपाटावर’ फोन ठेवणारा मराठी खासदार
- निवडणूक आयोगानं शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ नाकारत ‘बिस्किट’ दिलं
- दिलासादायक : नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; राज्याचा रिकव्हरी रेट ८३ टक्क्यांवर
- वडिलांच्या चितेला अग्नी देताना चिराग पासवान यांना आली चक्कर
- सरकारी निधीतून चालवले जाणारे मदरसे नोव्हेंबरपासून बंद करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

