Share

‘भाजपच्या लबाड आश्वासनाला आता पंढरपूरकर जनता भुलणार नाही’

Published On: 

पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत भालके यांचे चिरंजीव भगरिथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडून बसले आहेत.मतदान अवघ्या काही दिवसांवर आल्याने प्रचारसभांसह राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार होते तेव्हा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यांच्या प्रश्नांत भाजप नेत्यांनी कधी लक्ष घातले नाही. आता केंद्रातून पैसे आणून 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस देत सुटले आहेत. भाजपच्या या लबाड आश्वासनाला आता पंढरपूरकर जनता भुलणार नाही, असा घणाघात पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

एका जाहीर सभेत बोलताना पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना माजी आमदार भारत भालके यांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविकास आघाडीचे भगीरथ भालके यांनाच विजयी करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.माजी आमदार भारत भालके नाना हे गोरगरिबांचे नायक होते. नडल्या अडल्या लोकांचे ते दाता होते. या नानांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढय़ातील जनतेने भगीरथ भालके यांनाच विजयी करावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!