जालना: राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढत असल्याने प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला होता, पण त्यानंतर सुद्धा कोरोनाचा संसर्ग थांबत नसल्याने आता राज्यसरकारने ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात बुधवारी रात्री आठवाजेपासून तर येत्या १ मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत.
त्यानुसार वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांमधील रुग्णालये, रोग निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने, औषध निमिर्ती उद्योग, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांच्या डीलर्स, वाहतूक आणि पुरवठा साखळी,लस, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांची सहाय्यक, कच्चा माल युनिटस आणि सहाय्य सेवा यांचे उत्पादन आणि वितरण सुरू राहणार आहे.
त्याचबरोबर पशुवैद्यकीय सेवा, किराणा सामान, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध विक्रेते, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने, कोल्ड स्टोरेज आदी सुरू राहणार आहे. दरम्यान, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.त्यामुळे विनाकारण फिरणे नागरिकांनी टाळावे असे आवाहन प्रशासन करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

