मुंबई : लॉकडाऊनची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील एक महिना शिवभोजन थाळी मोफत वाटप करणार असल्याची घोषणा केली होती. राज्यात शिवभोजन थाळीला प्रतिसाद देखील चांगला मिळतोय. मात्र, या सर्वाचे श्रेय केवळ मुख्यमंत्री आणि शिवसेना घेत असल्याचे दिसून येतय. त्यामुळे या श्रेयवादात आता काँग्रेसने देखील उडी घेतली आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने या संबंधी जाहीरात तयार करून ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्व ठिकाणी शिवभोजनच्या बोर्डवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो असताना काँग्रेसच्या बॅनरवरुन मात्र, मुख्यमंत्र्यांचा चेहरा गायब असल्याचे दिसत आहे.
कोरोना संकटाचा सामना करताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भारतीय जनता पक्ष असा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो. मात्र, महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्येही सर्व काही ठिक नाही हे वारंवार समोर येत आले आहे. यातच आता शिवभोजन थाळीच्या श्रेयवादाचीही भर पडली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना, शिवभोजनचे श्रेय केवळ शिवसेनेला मिळते आहे. त्यामुळे काँग्रेसने देखील शिवभोजन थाळीच्या मोफत वाटपात श्रेय लाटण्याचा प्रयत्न केलाय.
निर्बंधांच्या काळात निराश्रित, श्रमिक, बेघर अशा कोणावरही उपाशी झोपण्याची वेळ येऊ नये. यासाठी महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध करुन दिली.
आज ही थाळी हजारो भुकेल्यांची भूक भागवत असून पुढेही हे कार्य अखंडपणे सुरु राहील कारण कोणीही उपाशी राहणे आम्हाला मान्य नाही! pic.twitter.com/TnxBgO3qY2
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 17, 2021
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसला फारसे काही मिळालेले नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी या संदर्भात अनेकदा तक्रारी देखील केल्या आहेत. यातच आता लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना मोफत देण्यात येत असलेल्या थाळीचीही भर पडली आहे. यामध्ये श्रेय घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दिसून येतोय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा
- आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंचे तिहेरी सुवर्णयश
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!


