Share

कोरोनाचा कळंब आगाराला लाखोचा फटका, मागील दोन दिवसांपासून बस फेऱ्या पूर्णतः बंद

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढतच चालला आहे. यामुळे शासनाने राज्यात संचारबंदीसह कोरोनाचे विविध नियम, निर्बंध जारी केले आहेत. परिणामी कळंब आगारातुन सुटणाऱ्या बसफेऱ्या पुर्णत: बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगाराला प्रतिदिन लाखो रुपयांचा फटका बसत आहे. येणाऱ्या काळात अजून मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कोरोना महामारीमुळे कळंब शहरासह तालुक्यातील गावे ओस पडली आहेत. त्याच बरोबर कळंब बसस्थानक प्रवाश्या विना ओस पडलचे दिसत आहे. एसटी महामंडळाच्या कळबं आगारातील बस प्रतिदिन मंजूर २४४ फेऱ्या व २७ हजार ९६७ किलोमिटर प्रवास करत आहेत. तर बाहेरील आगाराच्या जवळपास २०० बस ये-जा करतात. परंतु, त्या गेल्या दोन दिवसापासून बसफेऱ्या पूर्णत: बंद आहेत. त्यामुळे अन्य आगारातील बसही येणे बंद झाले आहे. कळबं आगारात एकूण ८० बस आहेत. त्याच बरोबर महामंडळाच्या मालवाहतूक ८ बस आहेत. या आठही बस सध्या बाहेरील आगारात अडकून पडले आहेत.

यामुळे महामंडळाला प्रतिदिन अडीच ते तीन लाखाचा फटका बसला आहे. १ एप्रिलपासून जवळपास १३ हजार किलोमीटरच्या ८७ ते ९० फेऱ्या या आगारातून केल्या होत्या. त्याही आता बंद झाले आहेत. कोरोणा विषाणूच्या संसगार्मुळे कळंब तालुक्यातील एसटी महामंडळाची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून फेऱ्याही रद्द कराव्या लागत आहेत. पुणे ,मुंबई, औरंगाबाद, लातूर, नांदेड अशा अनेक भागात जाणारा येणाराची संख्या मोठी असून त्यात खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने १ मे पर्यंत संचारबंदी लागू केलेले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!