Share

‘मोदी निवडणुकीत व्यस्त आहेत, तुम्ही नंतर फोन करा’, मुख्यमंत्री ठाकरेंना मिळाले उत्तर

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. पण केंद्र सरकारला याचे सोयरेसुतक नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अशातच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत व्यस्त होते. कोरोनाच्या संकटातही त्यांनी बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची करत अनेक मोठमोठ्या सभा घेतल्या. त्यामुळे देशाच्या कारभारावरील त्यांचे लक्ष हटल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

दरम्यान, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन यावरून ठाकरे सरकार आणि मोदी सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. केंद्र सरकार महाराष्ट्राला दुय्यम वागणूक देत असल्याची टीका महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. नेमके याच अनुषंगाने युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी उपरोधिकपणे मोदी सरकारवर टीका केली आहे. सत्यजीत तांबे यांनी एक काल्पनिक संवाद प्रसिद्ध करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमओ कार्यालयादरम्यान झालेला काल्पनिक संवाद मांडला आहे. यात मुख्यमंत्री ठाकरे हे पीएमओ कार्यालयात फोन करतात. ते पीएमओ कार्यालयााला महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांच्याशी बोलायचं असल्याचं सांगतात. तर पीएमओ कार्यालयाकडून पीएम सध्या डू नॉट डिस्टर्ब मोडवर असल्याचं उत्तर येतं. यावर उद्धव ठाकरे पंतप्रधान कधी उपलब्ध होतील, असं विचारतात. त्यानंतर पीएमओ कार्यालय ते २ मे नंतर सर्व राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर उपलब्ध होतील, अशी माहिती देतात. हा संवाद पूर्णपणे काल्पनिक असून मोदी बंगाल निवडणुकीत व्यस्त असल्याचे सांगण्यासाठी तांबे यांनी हे ट्विट केलेय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!