Share

मोदी सरकारने झोपेचे सोंग घेतल्याने जनता त्रस्त, अशोक चव्हाणांचा नांदेडमध्ये हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत असला तरी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. वाढती महागाई तसेच इंधन दरवाढी विरोधात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला, या वेळी ते बोलत होते.

युपीए सरकारच्या कार्यकाळात एक किंवा दोन रुपयांची जरी पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तर विरोधी पक्ष म्हणून भाजप मोठ्या प्रमाणात टीका करत होते. त्यांनी त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतही मोठा गोंधळ घातला होता. आता मात्र, पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वर गेले आहेत. तर डिझेलचे दरही वाढले आहे. असे असतांना केंद्रातील सत्ताधारांनी झोपेचे सोंग घेतले असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या दरात झालेली वाढ सर्वसामान्यांवर मोदी सरकारचा हल्ला असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीने राज्यात आंदोलने सुरू आहेत. यात नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!