नवी दिल्ली: पेगासस (Pegasus) प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने पेगाससच्या खरेदीची बातमी छापल्याने भारताच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसने (Congress) केली आहे. तसेच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील केंद्र सरकारवर चांगलीच टीका केली आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करून हल्ला चढवला आहे. मोदी सरकारने आपल्या लोकशाहीतील प्राथमिक संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली होती. विरोधक, न्यायपालिका आणि लष्कराचे फोन टॅप करून सर्वांना टार्गेट केलं. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
मोदी सरकार ने हमारे लोकतंत्र की प्राथमिक संस्थाओं, राज नेताओं व जनता की जासूसी करने के लिए पेगासस ख़रीदा था। फ़ोन टैप करके सत्ता पक्ष, विपक्ष, सेना, न्यायपालिका सब को निशाना बनाया है। ये देशद्रोह है।
मोदी सरकार ने देशद्रोह किया है। pic.twitter.com/OnZI9KU1gp
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 29, 2022
आता देशात पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना पेगासस प्रकरणामुळे भाजपची गोची होणार असल्याची चर्चा सध्या होत आहे. विरोधकांना आता पेगाससचा आयता मुद्दाच मिळाला असल्याने या प्रकरणावरून केंद्र सरकारला चांगलेच वेठीस धरणार असल्याचे दिसत आहे. स्वतःला चौकीदार म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींनी चांगलाच निशाणा साधला आहे. आता या प्रकरणी पुढे काय होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘मोदी सरकारने संसदेत खुलासा करावा’, पेगासस प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
‘आघाडीत बिघाडी करण्याचा चंद्रकांत पाटलांचा विचार’; उदय सामंत यांचे प्रत्युत्तर
“…ते किती पितात, कधी पितात ही सगळी माहिती आमच्याकडे”; नवाब मलिकांचा खोचक टोला!
देशातील टॅक्सपेयर लोकांचा पैसा मोदी सरकारने पेगासस सॉफ्टवेअर घेण्यासाठी वापरला- जितेंद्र आव्हाड
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी उदय सामंत यांचा पुढाकार; म्हणाले…


