Share

“…ते किती पितात, कधी पितात ही सगळी माहिती आमच्याकडे”; नवाब मलिकांचा खोचक टोला!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन संदर्भात निर्णय झाल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देखील टोला लगावला आहे. भाजपमधून बरेच लोक राष्ट्रवादीत येणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा पक्ष फुटनार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला नवाब मलिक यांनी चंद्रकात पाटंलाना दिला आहे.

विदेशी कंपन्यांचे जे मालक आहेत त्यांच्या हितासाठी वाईनसंदर्भात निर्णय घेतल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर बोलताना नबाव मलिक म्हणाले, “हा निर्णय महाराष्ट्रात होण्याअगोदर मध्य प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश व इतर भाजपशासित राज्यांमध्ये झाला आहे, म्हणजे भाजपची विदेशी कंपन्यांसोबत डिल झाली आहे का? ज्याप्रमाणे भाजपचे लोक सांगतात बेवड्यांसाठी हा निर्णय झाला तर आमचे म्हणने आहे, भाजपला वाईनबद्दल ऐवढा विरोध असताना जे वाईनरी भाजपच्या नेत्यांच्या मालकीची आहेत. त्यांचे वाईन शॉप, बार बंद करणार का?”

तसेच बेवड्यांसाठी हा निर्णय झाला, असे जे बोलतात ते किती पितात, कधी पितात हि सगळी माहिती आमच्याकडे आहे. देवेंद्रजी हे सगळे आरोप बिनबुडाचे लावत आहेत, असे नवाब मलिक म्हणाले.

महाराष्ट्रात भाजप फुटणार

ज्याप्रकारे काँग्रेसमधून नेते कार्यकर्ते राष्ट्रवादीत येत आहेत एक दिवस राष्ट्रवादी पक्ष शिवसेना आणि काँग्रेस या दोघांचे कार्यकर्ते आपल्या बाजूने घेईल. पक्ष संपवण्याचं आणि खाण्याचं काम राष्ट्रवादी करत आहे, चंद्रकांत पाटलांच्या या आरोपावर नवाब मलिक म्हणाले, भाजपमधून बरेच लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत. काही सिटींग आमदार भाजप सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. तुमचा पक्ष फुटणार नाही याकडे लक्ष द्या. आगामी काळात अनेक भाजपचे नेते पक्ष सोडणार आहेत, या भितीपोटी चंद्रकांत पाटील आमच्या मित्रपक्षांच्या बाबतीत बोलत आहेत. भाजप निश्चित रुपात महाराष्ट्रात फुटणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!