रत्नागिरी: देशभरात कोरोनाने थैमान घातले असून सर्वसामान्य ते अनेक सेलिब्रेटी,राजकीय नेते हे देखील या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. तर, या काळात आपले कर्तव्य बजावत खरे कोरोना योद्धे ठरणाऱ्या या देवदूतांवर देखील कोरोनाने घाला घातल्याचे अनेक दुःख घटना समोर येत आहे. तर, पोलिसांपासून ते रुग्णालय कर्मचारी यांना देखील आपले प्राण गमवावे लागले आहेत.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांना आतापर्यंत ४२ चिमुकल्यांना कोरोनामुक्त केले आहे. त्यांना काही दिवासांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.
‘आपली मुंबई सुरक्षितच आहे’, नाव न घेता सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला
डॉ. दिलीप मोरे यांनी आपल्या ४० व्या वर्षी वेगळा असा ठसा रत्नागिरी जिल्ह्यात उमटवला होता. डॉक्टर मोरे यांनी आपली सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी त्यांना कोरोना झाला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारांना त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. यासंदर्भात झी २४ तासने वृत्त दिले आहे.
चिंताजनक : कोरोनाने घेतला देशभरात आत्तापर्यंत ४० हजारांहून अधिक लोकांचा बळी
दरम्यान, काल राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री व शिवसेना नेते अनिल राठोड यांचे देखील निधन झाल्याने राजकीय क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. तर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या देखील सहकाऱ्याचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता, अहवाल निगेटिव्ह आला आहे.
राज्यात कोसळधार : राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

