मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील १२ तासातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात २१५.८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०१.९ मिलीमिटर तर पश्चिम उपनगरांमध्ये ७६.०३ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ३०९ मिलीमीटर पाऊस महापालिकेच्या ‘डी’ विभाग परिसरात नोंदविण्यात आला आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचाही सर्वाधिक वेग नोंदविण्यात आला आहे. मरीन लाईन्स परिसरात दरताशी तब्बल १०१.४ किलोमीटर एवढा वाऱ्यांचा कमाल वेग सायंकाळी ४:१५ च्या सुमारास नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे अतिवृष्टीच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामगार – कर्मचारी – अधिकारी अव्याहतपणे कार्यरत होते.
आजच्या अतिवृष्टीच्या काळात बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध सखल भागांमध्ये पाण्याचा निचरा तातडीने व्हावा, यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे आणि २९९ ठिकाणी बसविण्यात आलेले तात्पुरते पाण्याचा उपसा करणारे संच सुसज्ज आणि कार्यतत्पर ठेवण्यात आले होते. या व्यवस्थेचा आवश्यकतेनुसार आणि वेळोवेळी वापर करण्यात आला. तसेच अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह आणि साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात आहेत.
मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक टीमला सज्ज राहण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्यातील विविध भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कंट्रोल रुमला भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कंट्रोल रुममधील सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापुरात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील सांताक्रूझला 65 मिमी तर कुलाब्याला 229 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज आहे”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. “मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. धोक्याची परिस्थिती बघता आतापर्यंत आपण पाच एनडीआरएफचे पथक तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत”, असं वडेट्टीवार म्हणाले.
अनिलभैय्या गेले अन् राष्ट्रवादीचा आमदार ढसाढसा रडला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

