नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात या जीवघेण्या विषाणूमुळे ४० हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत म्हणजेच बुधवारी सकाळी ८ ते ८ या काळात देशभरात कोरोना विषाणूमुळे ९०४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे ४० हजार ६९९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना विषाणूच्या नव्या रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. देशात दररोज ५० हजाराहून अधिक कोरोनाचे नवे रूग्ण आढळून येत आहेत यामुळे कोरोना रुग्णांचा आलेख दररोज वाढता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात २४ तासांत कोरोना विषाणूची लागण झालेल्या ५६ हजार २८२ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर यामुळे आतापर्यंत १९ लाख ६४ हजार ५३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
‘आपली मुंबई सुरक्षितच आहे’, नाव न घेता सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला
दरम्यान, देशात सध्या ५ लाख ९५ हजार ५०१ अॅक्टिव्ह रूग्ण असून त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १३ लाख २८ हजार ३३७ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन


