कोल्हापूर: लग्न म्हंटलं की, उखाणा हा आलाच. मात्र याच उखाण्यातून जनजागृती करण्याचे काम देखील अनेकदा केले जाते असाच एक उखाणा सध्या व्हायरल होत आहे. करवीर तालुक्यातील चाफोडी गावातील मंगेश कांबळे यांचा 21 फेब्रुवारीला विवाहसोहळा पार पडला. मुरगुडमधील संध्या यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मंगेश हे कोल्हापुरातल्या शेंडा पार्क येथील शाखा कार्यालयात सिनियर टेक्निशियन म्हणून नोकरी करतात. त्यांनी महावितरण कंपनीवर असलेली निष्ठा उखाण्यामधून दाखवून दिली आहे.
याला म्हणतात कर्तव्यदक्ष कर्मचारी !!! pic.twitter.com/tOpTUSeOnj
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) February 24, 2021
‘आयुष्यभर साथ देतो तोच जोडीदार खरा… संध्याचे नाव घेतो सर्वांनी लाईटचं बिल भरा..!’ असा उखाणा त्यांनी आपल्या मित्रांच्या आग्रहाखातर घेतला. त्यांचा हा उखाणा व्हायरल झाला आहे.
मंगेश कांबळे यांच्या उखाण्याचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीसुद्धा त्याची दखल घेतली. त्यांनी आपल्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विट केला आहे. शिवाय ‘याला म्हणतात कर्तव्यदक्ष कर्मचारी’ असे म्हणत मंगेश कांबळे यांचे कौतुकही केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंगाल को अपनी बेटी चाहिए, बुआ नहीं’ भाजपकडून तृणमूलला जोरदार प्रत्युत्तर
- सावधान! ‘या’ रुग्णांची माहिती लपवल्यास होणार २ वर्षांचा कारावास
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद

