मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन होत असल्याने राज्यात देखील पुन्हा कोणते कडक निर्बंध लागणार याकडे सामान्य जनतेचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पुन्हा लॉकडाऊन करण्यास महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील नेत्यांसह मंत्र्यांचा देखील विरोध असल्याचं समोर आलं आहे.
भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लॉकडाउनच्या मुद्द्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावबर हल्लाबोल केला आहे. ‘ राज्यात कोरोना वाढतोय, त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे मित्र पक्ष लॉकडाऊन करायला तयार नाहीत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उतावीळ झाले आहेत,’ असं टीकास्त्र नारायण राणे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आरोपींचा बचाव करण्याचा मविआ सरकारचा अट्टाहास का ? फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या! नाना पटोलेंची केंद्राकडे मागणी
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ममता दीदी नंदीग्राममध्ये पराभूत होणार ; अमित शहांची भविष्यवाणी
- Breaking : पुण्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘हे’ असणार कडक निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

