Share

शरद पवार ‘जाणते राजे’च आहेत याच्यावर मी ठाम:जितेंद्र आव्हाड

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा:कुणी काहीही म्हणो मी अजूनही शरद पवार हे ‘ जाणते राजे’च आहेत या मुद्द्यावर ठाम आहे,असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपण पवारांचे खंदे समर्थक असल्याचे दाखवून दिले आहे.

भाजपच्या एका नेत्याने ‘कल के शिवाजी आज के मोदी’ हे पुस्तक लिहून त्याचे भाजप कार्यालयात प्रकाशन केले. यावरून संपूर्ण देशात भाजपवर टीका होत आहे. दुसरीकडे भाजपकडून शरद पवार यांना लक्ष केले जात असून शरद पवार यांना जाणता राजा संबोधण्यावर भाजपने आक्षेप घेतले आहे. दरम्यान यावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार हे जाणते राजाच आहे असे म्हटले आहे.आता याच मुद्यावर जितेंद्र आव्हाड यांनीही जोरदार समर्थन केले आहे.

जो या महाराष्ट्रात आणि देशात समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करतो, तो जाणता राजा असतो. त्यामुळे कुणीही त्यावर कुणी आक्षेप घ्यायची गरज नाही.असे संजय राऊत पुढे म्हणाले होते.यावर जितेंद्र आव्हाड यांची ही बोलकी प्रतिक्रिया आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!