🕒 1 min read
मावळ : राज्यात जुलै महिन्याच्या मध्यानंतर पाऊस सक्रिय झाल्यामुळे अनेक जिल्ह्यातील धरण साठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात गंभीर पूर स्थिती निर्माण झाली होती. पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरण साठ्यात वाढ होत आहे. खडकवासला धरणातून कमी-अधिक प्रमाणात विसर्ग सुरु असून आता मावळ तालुक्यातील पवना धरण ८५ टक्के भरले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्याची पवना धरणातून तहान भागवली जाते. हे धरण भरू लागल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून धरणातून आता विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज (दि. २९ जुलै) दुपारी चार नंतर धरणाच्या सांडव्यावरून विसार्ग सुरु करण्यात येणार आहे.
विद्युत जणित्रा द्वारे १४०० क्युसेक्स तर सांडव्याद्वारे २१०० क्युसेक्स असा एकूण ३५०० क्युसेक्सचा विसर्ग सुरु करण्यात येणार असून पावसाचा जोर वाढल्यास वा कायम राहिल्यास हा विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो. यामुळे प्रशासनाने मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील गावांनी, वस्त्यांनी वेळीच खबरदारी घेऊन योग्य ठिकाणी जनावरे, अवजारे, वस्तू, आणि इतर सामुग्री सुरक्षित स्थळी हलवावे असं आवाहन केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निवड आपलीच आहे जंगलाचा राजा हवा की…,शरद पवारांचा सवाल
- पदार्पण करताच पडिक्कलचा खास विक्रम ; ठरला पहिलाचं भारतीय फलंदाज
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
