Share

‘पटोले, वडेट्टीवार, भुजबळ, मुंडे, शेंडगे हेच लोक मराठा आरक्षणाचे कट्टर विरोधक’!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- मराठा आरक्षण न्यायालयात प्रलंबित आहे. आरक्षणासाठी सरकार नीट बाजू मांडत नसल्याचा आरोप वेळोवेळी मराठा समाजातील नेत्यांनी केला आहे. पटोले, वडेट्टीवार, भुजबळ, दोन्ही मुंडे, शेंडगे हेच लोक मराठा आरक्षणावर बाहेरून आमचा विरोध नाही असे म्हणतात पण आतून मराठा आरक्षणाचे कट्टर विरोधक हेच आहेत. केवळ यांच्यामुळेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना त्रास होत आहे, असे मत मराठा क्रांती मोर्चाचे समनवयक आबा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणावरून वाद विवाद पाहायला मिळत आहे. त्यात आता मराठा क्रांती मोर्चाचे समनवयक आबा पाटील यांनी थेट महाराष्ट्रातील नेत्यांची नाव घेऊन मराठा आरक्षणाला यांचा विरोध आहे असा आरोप केला आहे. दरम्यान, महावितरणमध्ये मराठा उमेदवारांना डावलून नियुक्त्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला. त्यासाठी मराठा समाजाने १ व २ डिसेंबरला प्रत्येक जिल्ह्यात अधिक्षक कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले होते. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रभरातील मराठा समाजाकडून मुंबई येथे लॉंग मार्च काढण्यात येणार, अशी माहिती मराठा समाज समन्वयकांनी दिली आहे.

मराठा आरक्षणाबद्दल लिहिताना आबा पाटील यांनी म्हटले की, पटोले, वडेट्टीवार, भुजबळ, दोन्ही मुंडे, शेंडगे हेच लोक मराठा आरक्षणावर बाहेरून आमचा विरोध नाही असे म्हणतात पण आतून मराठा आरक्षणाचे कट्टर विरोधक हेच आहेत. केवळ यांच्यामुळेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना त्रास होत आहे, असे आबा पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!