🕒 1 min read
औरंगाबाद: महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच्या शौर्याचे आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. मोगलांविरुद्ध त्यांनी तलवार चालवली. हिंदूंचे रक्षण केले. महिलांचे आणि मंदिराचे रक्षण केले. त्यामुळे जर कोणी महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज(Chattrapati Shivaji Maharaj) यांना विरोध करणार असेल, तर तर त्यांची तलवार आजही आमच्या हातात आहे. असा इशारा शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांना दिला आहे.
औरंगाबादेत गेल्या दोन दिवसापासून महाराणा प्रताप यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या पुतळ्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण पेटले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप पुतळा उभारणीवर एक कोटी निधी खर्च करण्याऐवजी त्यांच्या नावाने ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. त्यांच्या मागणीनंतर आणि महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला केलेल्या विरोधानंतर जलील यांना शिवसेनेतून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे.
आमदार अंबादास दानवे यांनी त्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आता थेट संजय राऊत यांनी त्यांच्या विरोधात टीका केल्याने वातावरण आणखीनच पेटणार असल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत म्हणाले, एमआयएम महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध कशासाठी करत आहे? ज्या महाराणा प्रतापांनी मोगलांविरुद्ध आक्रमणकर्त्यांविरुद्ध शौर्य गाजवले त्यांच्या विरोधात एमआयएम इम्तियाज जलील विरोध करणार असतील, तर महाराणा प्रताप यांची तलवार आजही आमच्या हातात आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावे असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
“जे आपल्या उमेदवारांवर विश्वास टाकू शकत नाहीत त्यांच्यावर जनता कसा विश्वास टाकणार?”
-
“आर.आर.आबांच्या स्वप्नांना तिलांजली”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून चित्रा वाघ आक्रमक
-
Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत
-
पर्रीकरानंतर भाजपच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांनी केली अपक्ष लढण्याची घोषणा
-
“विचार आणि उच्चारांत सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले नेते बाळासाहेब ठाकरे”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
