Share

औरंगाबादेत शिवसेना-भाजप युती; नानांच्या सोबतीने सत्तारांनी फडकवला सेना-भाजपचा झेंडा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर अखेर शिवसेना भाजप युतीचा झेंडा फडकला आहे. अब्दुल सत्तार(Abdul Sattar) आणि हरिभाऊ बागडे(Haribhaou Bagde) गटाने याठिकाणी विजय मिळवला आहे.  १४ पैकी १४ जागा जिंकत शिवसेना भाजप याठिकाणी विजयी ठरले आहेत. त्यामुळे राज्य जरी महा विकास आघाडीची सत्ता असली तरी दूध उत्पादक संघात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यशस्वीपणे शिवसेना-भाजप समेट घडवून आणला आहे. सध्या शिवसेना-भाजप युतीच्या या विजयाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजप-शिवसेना युती चा पूल नितीन गडकरीच बांधू शकतात असे विधान त्यांनी केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकारण पेटले होते. चंद्रकांत खैरे पासून ते थेट संजय राऊत यांनी देखील सत्तार यांच्यावर टीका केली होती. मात्र जी युती राज्यात होऊ शकत नाही ती सेना-भाजप युती सत्तारांनी औरंगाबाद जिल्हा दूध संघात घडवून आणली आहे.

अब्दुल सत्तार यांनी भाजपला सोबत घेऊन दूध संघावर सत्ता आणली आहे. औरंगाबाद तालुका मतदारसंघातून भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सुरेश पठाडे यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जात होती. हरिभाऊ बागडे यांचा यात विजय झाला आहे. चौदाही जागा जिंकत शिवसेना आणि भाजपने या ठिकाणी आपली सत्ता आणली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!