मुंबई –टीव्हीवर पाहिले की पदेशातून आपल्या देशाला आरोग्य साहित्याची मदत होत आहे. विमाने भरुन येत आहेत. मात्र, त्यातलं महाराष्ट्राला अजून तरी काही मिळालेले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. या वेळी त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर टीका केली.
जयंत पाटील म्हणाले की, ‘केंद्र सरकारकडून ज्या प्रमाणात लस येत आहे त्या प्रमाणात जिल्ह्यात लसीकरण केले जात आहे. शासन दुसऱ्या डोसला प्राधान्य देत आहे आणि त्याचप्रमाणे प्रशासन नियोजन करत आहे. १३ कोटी जनतेला लस देणे ही मोठी जबाबदारी आहे, आम्ही सर्वच जास्तीत जास्त लस मिळावी याचा प्रयत्न करत आहोत. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते महाराष्ट्रावर टीका करतात त्यांच्या टीकेला आता काही अर्थ उरला नाही कारण पंतप्रधानांनी स्वतः महाराष्ट्राचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र सरकारने खरंच चांगली कामगिरी केली आहे. आपण उत्तरेकडील राज्यांशी तुलना केली तर आपल्याला ते दिसेल.’
पाटील यांच्या या टीकेला आता भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जयंत पाटील यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. मदतीची विमानेच्या विमाने येत आहेत, ती नेमकी कुठे जात आहेत याचा खुलासा केंद्राने करावा” म्हणून विचारणाऱ्या जयंत पाटलांनी आधी महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला आणि कोणी विकला त्याचा खुलासा करावा. परदेशी मदतीचे सुयोग्य वाटप करायला मोदी सरकार समर्थ आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी माझ्या भावाचा दंड भरण्यास तयार आहे’, भावासाठी कामरान अकमल सरसावला पुढे
- मातृदिनादिवशी धनश्रीने शेअर केला आईचा भन्नाट डान्स ; लिहिली भावनिक पोस्ट
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- ‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
