Share

नांदेड येथील गृह विलगीकरणातील रुग्ण फिरतात बिनधास्त, प्रशासनाकडे तक्रार

Published On: 

नांदेड : शहरासह जिल्ह्याभरामध्ये कोरोना रुग्णांचा वाढीचा कहर झाला आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालये देखील कोराना रुग्णांना दाखल करण्यासाठी कमी पडू लागले आहेत. परंतू गृह विलगीकरणामध्ये असलेले रुग्ण बिनधास्त फरताना आढळुन येत आहेत. या बाबत नागिराकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या आहेत. पण याचा उपयोग होताना दिसत नाही.

कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस खुप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सरकारने रुग्णालये कमी पडत असल्यामुळे रुग्णांना आपापल्या घरी म्हणजेच गृह विलगीकरणामध्ये राहण्याची तसेच औषधोपचार घेण्याची मुभा दिलेली आहे. परंतू या गृह विलगीकरणामध्ये असलेले रुग्ण धान्य तसेच किराणा दुकान, मार्निंग तसेच इव्हिनिंग वॉक करण्यासाठी सर्रासपणे फिरताना दिसत आहेत. या वर या रुग्णांवर कोणी वॉच कोण करणार असा प्रश्न आता जिल्हा प्रशासनाला पडला आहे. त्यांच्या या मुक्तपणे फिरण्यामुळे जे नागरिकांना कोरानाचा संसर्ग झालेला नाही, अश्या कोरानाचा संसर्ग होवू लागला आहे.

त्यामुळे स्वत: सह दुसऱ्यांच्या जिवाला देखील या मुळे धोका निर्माण होत आहे. या मुळे नागिरकांनी या गृह विलगीकरणामधील रुग्णांवर अंकुश तसेच वॉच कोण देणार या बाबत जिल्हा प्रशासनाला प्रश्न विचारणे देखील सुरु केले आहे.गृह विलगीकरणाच्या नियमानुसार १० ते १४ दिवस राहणे आवश्यक आहे. परंतू ही गृह विलगीकरणामध्ये राहणारे रुग्ण फक्त चार ते पाच दिवसांमध्ये घराच्या बाहेर फिरताना आजुबाजुच्या नागरिकांना आढळून येत आहेत. या बाबत अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या आहेत.

त्यांचा हा मुक्त संचार कधी थांबणार आहे, असा सवाल या वेळी केला जावू लागला आहे. मागच्या वर्षीच्या पहिल्या लाटेतील कोराना रुग्णाचे घरच सील करण्यात येत होते. याची माहिती आजुबाजुच्या नागरिकांना होत होती. कोराेना पॉझिटीव्ह नसलेली व्यक्ती ही या रुग्णांपासून दुर राहू शकत होती. प्रशासन मागच्या वर्षी सील केलेल्या घरावर तसेच कोराना रुग्णांवर लक्ष देत होते. परंतू या गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांवर कोण वॉच ठेवणार हा मोठा प्रश्न नांदेडकरांना पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!