Share

अहमदनगरमध्ये रुग्णांना बेड मिळेना; जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 40 हजारांवर

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात ७९० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४० हजार ६५० एवढी झाली असून आत्तापर्यंत ३५ हजार ६४४ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.६९ टक्के इतके झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६६५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून काल दिवसभरात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. रोज ८०० ते ९०० कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालये व कोविड सेंटर सध्या फुल आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२३ आणि अँटीजेन चाचणीत ४१९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७०, संगमनेर ३, पाथर्डी ४, नगर ग्रामीण ९, श्रीरामपूर २,  नेवासे १२, अकोले १७, राहुरी १, शेवगाव ३, कोपरगाव ६, कर्जत ५, मिलिटरी हॉस्पिटल १५ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ७७, संगमनेर १६, राहाता १५, पाथर्डी १, नगर ग्रामीण २६, श्रीरामपुर १८, नेवासा १५, श्रीगोंदा ३, पारनेर १८, अकोले २, राहुरी १९, शेवगाव २, कोपरगाव १, जामखेड ६ आणि कर्जत ४ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १७, संगमनेर ७९, राहाता २७, पाथर्डी ४८, नगर ग्रामीण ६, श्रीरामपूर २१, कॅंटोन्मेंट ६, नेवासा ६, श्रीगोंदा २२, पारनेर १९, अकोले ४१, राहुरी १८, शेवगाव १२, कोपरगाव २८, जामखेड ३० आणि कर्जत ३९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!