Share

महेंद्रसिंह धोनीची अशीही एक ‘अंधश्रद्धा’; प्रज्ञान ओझाने केला खुलासा

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सवर १८ धावांनी मात करत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. चेन्नईने दिलेल्या २२१ धावांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ २०२ धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह चेन्नईने गुणतालीकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

या विजयानंतर धोनीचे चाहते चांगलेच खुश आहे. मात्र या दरम्यान चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीबद्दल एक नवी गोष्ट समोर आली आहे. धोनी सामन्यापुर्वी आपल्या सहकारी खेळाडुंना कधीच शुभेच्छा देत नाही किंवा ऑल द बेस्ट म्हणत नाही. कारण धोनीला असे वाटते की जर त्याने खेळाडूला शुभेच्छा दिल्या तर त्याची कामगीरी चांगली होणार नाही. त्यामुळे त्याने शुभेच्छा देणे थांबवले आहे. या गोष्टिचा खुलासा भारताचा माजी क्रिकेटपटु प्रज्ञान ओझाने केला.

महेंद्रसिंह धोनी हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसीचे तीनही स्पर्धात विजय मिळवला आहे. तसेच आयपीएलमध्येही त्याने चेन्नई सुपर किंग्सला ३ वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. एमएस धोनी सध्या आयपीएल २०२१ हंगामामध्ये व्यस्त असून त्याच्या चेन्नई संघाने सलग तीन सामने जिंकले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!