नांदेड: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. तरी सुद्धा आरोग्य यंत्रणा अविरतपणे रुग्णांला सेवा देत आहे, पण काही समाज कंठकांमुळे आरोग्य यंत्रणेला त्रास होत असल्याचं दिसून येत आहे. अशीच एक घटना मुखेडमधील कोविड सेंटरमध्ये घडली चाकूचा धाक दाखवून आरोग्य कर्मचाऱ्यांना शिविगाळ करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.कोर्टात हजर केले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आल्याची माहिती मिळाली. शहरातील फुलेनगरात राहणारे आदि विजय बनसोडे हे मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात कोविड वार्डात कंत्राटी पध्दतीने ब्रदर म्हणून कार्यरत आहे. २० एप्रिल रोजी आदि व त्यांचे सहकारी कर्तव्यावर असताना सायंकाळी ५ वाजता मुखेडमधील भाऊसाहेब मष्णाजी गायकवाड हा कोविड वार्डात आला. त्याचे नातेवाईक कोविड वार्डात उपचार घेत आहेत.
त्यावेळी तो नातेवाईकासोबत बोलत असताना शेजारच्या खाटावरील रुग्णाच्या नातेवाईकासोबत त्याचा वाद झाला. त्यावेळी भाऊसाहेबने जोरजोरात आरडाओरडा केला. तेव्हा, वार्ड बॉय तेथे जाऊन भाऊसाहेबला कोरोना वार्डात गोंधळ का करतो? असे विचारले असता त्याने शिविगाळ केली. हातातील चाकूचा धाक दाखवत त्याने मोठ मोठयाने आरडाओरडा केला. शासकीय कामात अडथळा निर्माण करीत तो तेथून निघून गेला, अशी फिर्याद देणात आली दिली.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्याचे जनतेला सामोरे जाण्याचे धाडसच झाले नाही?
- राज्यात १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू, ‘हे’ असतील निर्बंध
- …म्हणून शानदार कामगिरी करणाऱ्या फाफ डु प्लेसिसचं शतक थोडक्यात राहिलं !
- अवैध दारू विक्री करण्यासाठी आणणाऱ्या दोघांना पैठण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- औरंगाबादेत काँग्रेसची वैद्यकीय कमिटीद्वारे कोरोना रुग्णांना मदत!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

