Share

कोरोना रुग्णांसाठी ‘रेमेडिसिवीर’ जीवनदायी नाही; इंजेक्शनचा वापर आणीबाणीच्या स्थितीतच व्हावा

Published On: 

नांदेड: मागच्या वर्षभरापासून कोरोना महामारीने लोकांचे जगणे मुश्कील केले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे, या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रेमेडिसिवीर या इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली आहे. पण मुळात हे इंजेक्शन जीवनदायी नसल्याचे सांगितले जात आहे. या इंजेक्शनचा वापर अतिगंभीर रुग्णांसाठी व्हावा पण तरीही हे इंजेक्शन मनमानी पध्दतीने वापरले जात आहे.

त्यामुळे हे इंजेक्शन मूळ किंमतीपेक्षा किती तरी पटीने काळयाबाजारात विकल्या जात आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने एक मार्गदर्शक सूचना जारी करीत रेमडेसीवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी शंभर टक्के जीवनदायी ठरत नसल्यामुळे त्याचा सर्रास होणारा वापर थांबवा, टाळा असे जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत.

त्यानुसार रेमडेसीवीर इंजेक्शनचा कोरोना रुग्णांसाठी सर्रास होणारा वापर वा अनावश्यक वापर करणे वैद्यकीय संहितेच्या विरुध्द असल्याचे म्हटले आहे. तसेच रेमडेसीवीर हे इंजेक्शन प्रायोगिक तत्वावर आाणि आणीबाणीच्या स्थितीतच वापरासाठी आहे. कोरोना रुग्णांसाठी हे इंजेक्शन जीवनदायी ठरू शकत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू रोखण्यात मदत झाली असे काहीही अभ्यासात आढळून आलेले नाही. केवळ रेमडेसीवीर इंजेक्शन दिले की, कोरोना रुग्णाचा जीव वाचतो असे काहीही नाही.ज्यांचे आजार गंभीर आहेत किंवा ज्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे अशांसाठी ते वापरले जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!