Share

चंद्रकांत पाटील यांचे विधान म्हणजे उच्च दर्जाची मनोरंजन सेवा- प्रदीप देशमुख

Published On: 

पुणे : माध्यमांशी संवाद साधतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. चंद्रकांत पाटील यांचा सेन्स ऑफ ह्यूमर अतिशय चांगला असून पेट्रोल-डिझेलची दरवाढ, सिलिंडरचे वाढलेले दर आणि अन्नपदार्थांची सातत्याने वाढणारी महागाई यामुळे पोळलेल्या जनतेचे त्यांच्या विधानांमुळे चांगलेच मनोरंजन होत आहे.ही अतिशय उच्च दर्जाची मनोरंजन सेवा असून राज्य सरकारने कृपया त्यांच्या विधानांवर करमणूक कर लावू नये. तसेच जी व्यक्ती आपल्या शहरात जमेना म्हणून सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते त्या व्यक्तीला कुणीही सिरियसली घेत नाही, असेही ते म्हणाले आहेत.

पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जमेना म्हणून पवार साहेब मैदानात उतरले असे म्हणत टीका केली होती. यावर उत्तर देत प्रदिप म्हणाले की,’आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असून कैक प्रयत्नांनंतर देखील आघाडीच्या एकजूटीवर आणि सरकारच्या स्थिरतेवर तसूभरही परिणास होत नाही. यामुळे भाजपाच्या नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. या वैफल्यातून सावरण्यासाठी ते बेताल व बेलगाम वक्तव्याचा आधार घेत आहेत.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटने व इतर कार्यक्रम घेण्याचा धडाका लावला आहे. याचा अर्थ तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जमेना म्हणून मोदी प्रचारात उतरले असा घ्यायचा का? आदरणीय पवार साहेब आमचे सर्वोच्च नेते असून कार्यकर्त्यांशी ते सातत्याने संपर्कात असतात. जनतेशी पवार साहेबांशी असणारे हे बॉण्डींगच भाजपाच्या पोटात धडकी भरविणारे आहे.’ तसेच ‘आदरणीय पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे आणि पिंपरी महापालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडणार असून चंद्रकांत पाटील व मंडळींचे चेहरे पाहण्यासारखे होतील’, असा विश्वासही यावेळी प्रदीप यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!