Share

पिंपरी-चिंचवडकरांचे अभिनंदन, मिळाला ‘दबंग’ पोलीस आयुक्त

Published On: 

पुणे : देशातील ईंडस्ट्रीयल हब म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला आता एक नवीन दबंग पोलीस आयुक्त मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात अधिकार्यांच्या बदल्या झाल्या त्यात पिंपरी-चिंचवडला आयुक्त म्हणून कृष्णप्रकाश यांना नेमण्यात आले आहे. पदभार स्विकारल्यानंतर ‘शहरातील व्हाईट कॉलर गुन्हेगारी खपवून घेणार नाही. व्हाईट कॉलर गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी माथाडीच्या समस्या, अवैध धंदे रोखण्यासाठी झिरो टॉलरन्सवर भर देणार आहे. जनता हीच माझी दूत असून समाजव्यवस्था बदलण्यासाठी त्यांची मदत घेणार असल्याचे,’ प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केलं आहे.

मावळते पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी काल स्विकारला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे,उपायुक्त सुधीर हिरेमठ उपस्थित होते. आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले पिंपरी चिंचवड परिसर आयटी हब म्हणून ओळखला जातो. या परिसरात शैक्षणिक संस्थाही या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. शहराचा व परिसराचा अभ्यास करून कार्यपध्दती निश्चित केली जाईल.

‘त्यानं’ मला गाठलं…भाजपच्या नेत्याचा भावनिक संदेश!

कृष्णप्रकाश हे दबंग पोलीस अधिकारी मानले जातात. त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये काम करत असताना अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी कडक कारवाई केलेली आहे. त्यांनी याआधी दक्षिण मुंबई, सांगली, अहमदनगर, मालेगांव, बुलढाणा याठिकाणी काम केले आहे.

शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!