पुणे : गेले ५ गेले ५ महिने कोरोनाने राज्यात कहर माजवला आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक लोकप्राधिनिधी, समाजसेवक, मंत्री ते बॉलिवूड स्टार्स पर्यंत अनेकांना कोरोनाने विळखा घातला आहे. महिने कोरोनाने राज्यात कहर माजवला आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक लोकप्राधिनिधी, समाजसेवक, मंत्री ते बॉलिवूड स्टार्स पर्यंत अनेकांना कोरोनाने विळखा घातला आहे. पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना राजकीय क्षेत्रातील आमदार ते महापौर असे अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे या काळात निष्पन्न झाले आहे.
आता, भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जगदीश मुळीक हे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी स्वतः हुन ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी, भाजपने पुण्यातील सारसबागेत केलेल्या घंटानाद आंदोलनात देखील सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क आला असून त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
https://twitter.com/jagdishmulikbjp/status/1302285129599995904
जगदीश मुळीक यांनी, “‘त्यानं’ मला गाठलं याचं दु:ख नाही. पण तुम्हा सर्वांपासून काही काळ दुर जावं लागणार याचं वाईट वाटतं आहे. मी #कोरोना_पॉझिटीव्ह असल्याचं आज स्पष्ट झालं. आता युद्ध कोरोनाच्या विरोधात. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाच्या बळावर मी लवकरच ठणठणीत होईनच. तोवर तात्पुरता राम राम घ्यावा.” असे भावनिक ट्विट केले आहे.
कोव्हिड-१९च्या काळात कामाचे वाटप न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय – नीलम गोऱ्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

