Share

परमवीर सिंह यांना अटक होण्याची शक्यता, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Published On: 

अकोला : सचिन वाझे प्रकरणानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. या बदलीनंतर परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. या सगळ्या घटनेनंतर परमवीर सिंह चांगलेच चर्चेत आले होते.

आता परमबीर सिंह यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा गुन्हा नोंदवण्यात आला. ऍट्रोसिटी कायद्याच्या विविध २२ कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या भीमराव घाडगे यांनी २० एप्रिलला परमबीरसिंह यांच्याविरोधात राज्य सरकार आणि वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मध्यरात्री परमबीरसिंह यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

परमबीर सिंह यांच्याकडे ठाणे पोलीस आयुक्ताचा पदभार असताना त्यांनी हजारो कोटींचा भ्रष्ट्राचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केली आहे. संबधित तक्रार घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. परमबीर सिंह यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांवर भीमराव घाडगे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

तसेच परमबीर सिंग यांच्या पत्नी यांचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आले आहेत, असा आरोप भीमराज घाडगे यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा धक्कादायक आरोप अकोल्याच्या पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी केला आहे. या प्रकरणात परमबीर सिंग यांना कधीही अटक होवू शकते. अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!