Share

परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी माझ्यावर हा खोटा आरोप केला : गृहमंत्री

Published On: 

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. एका वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे.

या आरोपांवर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली आहे त्यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहेत. त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिलेली आहे. ‘मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. परमबीर सिंह ह्यांनी पदावर असताना हे आरोप केले असते तर त्यात दम वाटला असता, आता पदावरून दूर केल्यावर १०० काय १००० कोटी म्हणाले तरी लोकांना कळत.’

अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावलेले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!