औरंगाबाद : औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी आज लोकसभेत महाराष्ट्रातील माथाडी कामगारांचा प्रश्न उपस्थित केला. माथाडी बोर्डाकडून पीएफच्या नावाखाली कामगारांचा पैसा गोळा करून तो खासगी बँकांत भरला जातो. हा पैसा ताबडतोब केंद्र सरकारच्या पीएफ खात्यात जमा केला जावा, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केलीय. त्याचबरोबर माथाडी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेत झालेल्या महाघोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
लोकसभेत ते म्हणाले, ‘मी अशा लोकांचा प्रश्न उपस्थित करतोय, ज्यांचा आवाज सदनापर्यंत पोहचू शकलेला नाही. महाराष्ट्रात आपल्या डोक्यावर ओझे वाहतात, रेल्वे बोग्यांतून ओझी वाहण्यास मदत करतात किंवा बाजार समित्यांत आत हे लोक काम करतात. अशा हमाल किंवा माथाडी कामगारांचे शोषण होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने २५ वर्षांपूर्वी माथाडी बोर्ड बनवले होते. राज्यात जवळपास ३६ माथाडी बोर्ड अस्तित्वात आहेत. पुणे, औरंगाबाद, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती अशा वेगवेगळ्या भागात हे माथाडी बोर्ड आहेत. गरीब, अशिक्षित माथाडी कामगारांचं शोषण होऊ नये, हा बोर्ड बनवण्यामागचा उद्देश होता. या बोर्डाचा अध्यक्ष हा राजकारणाशी संबंधित असतो.
सध्याची परिस्थिती अशी आहे की मेहनत करतात आणि आपल्या मेहनतीचे पैसे थेट या माथाडी कामगारांना न मिळता ते बोर्डाकडे जातात. मजुरांच्या मेहनतीचे जवळपास ३० टक्के पैसे बोर्डाकडून आपल्याकडे ठेवले जातात. उरलेले ७० टक्के कामगारांच्या हाती पडतात. मजुरांच्या हक्कांच्या पैशांपैकी ३० टक्क्यांपैंकी १२ टक्के केंद्र सरकारच्या ‘एम्प्लॉईज प्रॉव्हिडन्ट फंड’च्या नावाखाली काढला जातो.
कायद्यानुसार, कोणत्याही संस्थेकडे २२ पेक्षा अधिक कामगार काम करत असतील तर त्यांच्या पीएफ फंडाची रक्कम केंद्र सरकारच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा केला जावा, अशी तरतूद आहे. परंतु, बोर्डाद्वारे लाखो कामगारांच्या हक्काचा, मेहनतीचा पैसा पीएफच्या नावावर जमा केला जात असला तरी यातील एक रुपयाही केंद्र सरकारच्या पीएफ अकाऊंटमध्ये भरला जात नाही.
लवकरात लवकर हा सगळा पैसा खासगी बँकांतून काढून केंद्र सरकारच्या पीएफ खात्यात जमा केला जावा. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली तर माथाडी बोर्डाचे अध्यक्ष गोत्यात येतील. या मजुरांची जबाबदारी ज्या श्रम विभागावर आहे त्यांच्यावरही कारवाई होईल’ अशी टिप्पणीही इम्तियाज जलील यांनी माथाडी बोर्डावर केलीय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही ७० वर्षांत काय केलं, याचा हिशोब आणलाय का’
- ‘काहीही लिहू नका, तिला स्वर्गात शांतपणे राहू द्या’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- आंदोलनासाठी दीर्घकाळ सार्वजनिक जागेचा ताबा घेणे चुकीचे; सुप्रीम कोर्टाने आंदोलकांना सुनावले खडेबोल
- ‘शिवाजी महाराजांच्या वाटेवर चालतो, असे सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का’?
- फेसबुक करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण स्मार्टवॉच बाजारात आणण्याची तयारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
