Share

Fact Check : एप्रिल महिन्यात सर्व प्रवासी रेल्वेगाड्यांच्या सेवा पुन्हा सुरू होणार ?

Published On: 

 मुंबई- कोरोनाकाळात संसर्ग वाढू नये म्हणून भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रवासी रेल्वे सेवा बंद केल्या होत्या. अनलॉक चारनंतर शासनाने शिथिलता दिल्याने मुंबई, पुण्यातील बहुतांश कंपन्या, शासकीयसह खासगी कार्यालये सुरू झाली आहेत मात्र अजूनही बऱ्याच गाड्या सुरु केल्या नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक अफवा सध्या सोशल मिडीयावर तसेच प्रसारमाध्यमांनी चालवल्याचे पाहायला मिळत आहेत. एप्रिल महिन्यात एका विशिष्ट तारखेपासून सर्व प्रवासी रेल्वेगाड्यांच्या सेवा पुन्हा सुरू होण्यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये अनेक प्रकारच्या वृत्तांची मालिका सुरू आहे.

प्रसारमाध्यमांना त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सर्व प्रवासी रेल्वेगाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी अशी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, असे त्यांना वारंवार सांगितले जात आहे.

रेल्वेती विविध रेल्वेगाड्यांच्या सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करत आहे.यापूर्वीच 65 टक्क्यांहून अधिक रेल्वेगाड्या धावत आहेत. एकट्या जानेवारी महिन्यात 250 पेक्षा जास्त गाड्यांची भर घालण्यात आली. त्यामध्ये कालांतराने आणखी वाढ होत जाईल.

या संदर्भात सर्व संबंधितांकडून मिळालेली माहिती विचारात घेण्याची आणि सर्व बाबींची काळजी घेण्याची गरज आहे.याबाबत कोणत्याही प्रकारची भाकिते टाळण्याची सर्वांना विनंती करण्यात येत आहे. याबाबत काही निर्णय झाल्यास प्रसारमाध्यमे आणि जनतेला त्याची माहिती कळवण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!