औरंगाबाद : सध्या पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसची करवाढ मोठया प्रमाणात झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्य व्यक्तीला जगणे कठिण झाले आहे. पेट्रोल-डिझेल -गॅस करवाढीच्या निषेधार्थ पॅथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन करवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
पॅथर्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची औरंगाबाद विमानतळावर भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले. मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पेट्रोल -डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढलेल्या दरामुळे सर्व सामान्य गोरगरीबस मध्यमवर्गीय लोकांना जगणे कठिण झाले आहे.
इंधन करवाढीमुळे वाहतुकीचे व दळण वळणाचे कर वाढलेले आहे. त्यामुळे जिवनावश्यक वस्तुच्या किंमती सुध्दा भरमासाठ वाढ झालेली आहे. कोविड-१९ सारख्या महामारीने गेल्या वर्षभरात सर्व सामान्य माणसाच्या हाताला काम नाही. त्यामुळे ते अडचणीत सापडले असून त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व पेट्रोल पंपावर इंधन भरण्याच्या पाईप पारदर्शक (पांढरा) बसविण्यात यावा, औरंगाबाद मध्ये पेट्रोल -डिझेल डेपो मंजुर झालेला आहे त्यांचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, रमाई आवास योजनेचे घरकुल बांधण्यासाठी मिळणारे २.५ लाख रुपयांऐवजी ३.५ लाख रूपये करण्यात यावे , प्रधानमंत्री आवास योजनेचे नोंदणी झालेल्या अर्जांना तत्काळ मंजुरी देऊन घरकुल योजना राबविण्यात यावी, मागासवर्गीय महामंडळाची लकी-ड्रॉ पद्धत रद्द करण्यात यावी, मागासवर्गीय महामंडळांना अनुदान देण्यात यावे यासह अशा एकूण ११ मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात प्रकाश निकाळजे, सर्जेराव मनोरे, अनिल मगरे, बाबूराव नरवडे, शरीफभाई, साहेबराव नवतुरे, संजय सातपुते, ज्ञानेश्वर खरात, सुनील मगरे, मधुकर नगराळे, राकेश साबळे, करण कल्याणी, भीमराज भुजंग, संदीप काळे, राजू निकाळजे, संजय अभंग, लताबाई थोरात, एकनाथ साळवे आदींचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या
- घाटीतील सफाई कामगारांना पदभरतीत सामावुन घ्या,आयटकची मुख्यमंत्र्याकडे मागणी
- मराठा समाजाने सामंजस्याची भूमिका घ्यावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे
- गटविकास अधिकारी राजगुरुना परत पाठवा; पंचायत समितीचा ठराव
- रेशीम शेतीमुळे वाढली आर्थिक उलाढाल, उमरावतीच्या शेतकऱ्यांची यशोगाथा
- …तर इंदापूरात डिपॉझिट जप्त झाले असते : अजित पवार


