बीड : विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच मतदारसंघात अॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळाले. बूथसंपर्क अभियान अंतर्गत आज तेलगाव येथे माजलगाव विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक १९३ आणि १९४ ची आढावा बैठक त्यांनी घेतली. या वेळी उपस्थित बूथप्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुखांना पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले.
मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे आपल्या मतदारसंघात तितक्याशा अॅक्टिव्ह दिसत नव्हत्या. मागील विधानसभा निवडणूक ही त्यांच्या अस्मितेची निवडणूक मानल्या जात होती. त्या निवडणुकीत पराभवानंतर पंकजा यांनी कार्यक्रमांमधून वेगळ्या राजकीय खेळीचे संकेत दिले होते. मात्र, त्या नंतर पुन्हा त्या शांत दिसल्या. त्या पराभवाला स्वीकारून त्यांनी आता पुन्हा कमबॅक केल्याचे चित्र आहे. यामुळे येत्या काळात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना नवा जोश मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे.
पुन्हा नव्या जोमाने त्यांनी आपल्या मतदारसंघाची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी बोलताना आपला बूथ पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आणि मजबूत करण्यासाठी ‘वन बूथ थर्टी युथ’ ही नवी संकल्पना प्रभावीपणे राबवून बूथची बांधणी करा,पक्षाची ताकद वाढवा आणि निष्ठेने पक्षकार्य करत राहा असे आवाहन त्यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- तिर्थक्षेत्रातील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जे.जे. रुग्णालयात घेतला कोरोना लसीचा डोस
- अखेर कावासाकी निंजा 300 ही बाईक लाँच !जाणून घ्या किंमत
- मोबाईल टॉवर्सकडे कोट्यवधी थकित, पालिका नेमणार खासगी एजन्सी
- रिलायन्स कर्मचाऱ्यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफात लस…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
