मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने अनेक पंकजा मुंडे समर्थक नाराज होते. याच पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचेही वृत्त होते. यानंतर आज पंकजा मुंडे यांनी आपल्या नाराज समर्थकांशी संवाद साधत त्यांना विश्वास दिला.
पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना त्यांनी भाजपला सूचक इशारा दिल्याचे दिसले. ‘कुणालाही पदावरून खाली खेचून मला माझी शक्ती वाया घालवायची नाही. माझी शक्ती या छोट्याशा मंडपात पुरणार नाही, असं सांगतानाच शक्तीच दाखवायची असती आणि दबावच आणायचा असता तर त्यासाठी ही जागा पुरणार नाही,’ असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
दरम्यान यावर आता विरोधकांनी देखील तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. याबाबत आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण प्रतिक्रिया दिली आहे. ‘मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात कुणाला घ्यावं, कुणाला नाही हा त्यांचा अधिकार आहे. त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. मंत्रिमंडळात संधी मिळेल अशा काहींच्या अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. मात्र, ही नाराजी काही दिवस चालत राहते,’ असे चव्हाण म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो’, नाना पटोलेंचा टोला
- प्रताप सरनाईकांचा दावा ठरतोय खरा, काँग्रेस-राष्ट्रवादीचं शिवसेना पोखरतायत ?
- ‘लसीकरण चार दिवस बंद तरी रेकॉर्ड केल्याचा दावा ; हा तर पोरखेळ’
- करीना-सैफच्या मुलांवरून केआरकेने केली भविष्यावाणी, म्हणाला…
- यामी गौतमचा नवा सिनेमा ‘लॉस्ट’, लग्नानंतर पहिलाच चित्रपट

