Share

पंकजा मुंडे ‘आयसोलेट,’ याबाबत स्वतः ट्विट करून दिली माहिती

Published On: 

मुंबई | राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी आज १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत असून ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती.

भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे पंकजा यांनी कोरोनाचीपरिस्थिती पाहता आयोसेलट होण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, पंकजा यांनी पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी औरंगाबादच्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही केले आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगितले आहे. ‘सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून isolate झाले आहे’ असं पंकजा यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. प्रचारानंतर आता पंकजा मुंडे या स्वत: विलगीकरणात गेल्या आहेत. त्यांनी रात्री यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली.

पंकजा यांनी ट्विट करत लिहिले कि, ‘पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,’ असं पंकजा मुंडे ट्विटच्या माध्यमातून म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!