मुंबई | शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी अजान स्पर्धेचं आयोजन केलं होतं. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपचे शिवेसेनेवर टीकास्त्र. भाजप नेते नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आव्हान केलं आहे.
‘आहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता ‘सेक्युलर’आहे नाहीतर ‘हो मी नामर्द आहे’ असं तरी?,’ असं नितेश राणे यांनी ट्विट करून शिवसेनेला टोला लगावला आहे.
पांडुरंग सपकाळ यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांना नमाजची गोडी लागावी म्हणून अजान स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावरून नितेश राणेंनी शिवसेनेला धारेवर धरून ट्विट करत शिवसेनेवर खोचक शब्दात टीका केली आहे.
आहो पक्षप्रमुख..
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 30, 2020
खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता "सेक्युलर"आहे..
नाहीतर "हो मी नामर्द आहे” असं तरी ?
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही : पाटील
- सावरपाडा एक्सप्रेस, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतची नोकरीसाठी राज्यपालांकडे धाव…
- धावत्या कारमध्ये थरार; मध्यप्रदेश मध्ये काँग्रेस आमदारावर प्राणघातक हल्ला !
- ऑनलाइन खरेदीवर मिळणाऱ्या ‘कॅश बॅक’विरोधी अ. भा. व्यापारी महासंघाची तक्रार…
- शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंग


