औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे भाजप-रिपाइं (ए.) व रासपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तालयात मराठवाड्यातून आलेल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपनं शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये मोठे बंड निर्माण होण्याची शक्यता होती.
पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं बोललं जात होतं. तर दुसरीकडे बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला. पोकळे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर जयसिंगराव गायकवाड यांनीही बंडखोरी करत अर्ज भरला. मराठवाड्यातील तीन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला जबर हादरा बसल्याचं बोललं जातं आहे.
मात्र, प्रवीण घुगे यांनी भाजपच्या आदेशानेच अर्ज भरला होता, एखाद्या वेळेस अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांचा अर्ज बाद झाला, तर उमेदवार असावा म्हणून अर्ज भरला आहे, असं स्पष्टीकरण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलं. त्यानंतर प्रवीण घुगे यांची भेट घेऊन पंकजा मुंडेंना घुगेंचे बंड थोपवण्यात यश आलं आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे , पंकजा मुंडे यांनी घुगे यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली आहे. त्यानंतर ‘मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतु पक्षाने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली पक्षाच्या सूचनेनुसार मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे,आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे ,मराठवाडा पदवीधर निवडणुकीचे प्रभारी आ.संभाजी पाटील निलंगेकर आ. मेघना दीदी बोर्डीकर शिरीष बोराळकर, विजय औताडे यांनी निवासस्थानी भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस च्या ताब्यातून पदवीधर मतदार संघ काढून घेण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करून भारतीय जनता पार्टी चा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’ अशी प्रतिक्रिया प्रवीण घुगे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- किरणोत्सव : चौथ्या दिवशी सुर्य किरणांनी अंबाबाईला संपूर्ण अभिषेक केला; पहा या सोहळ्याचे विलोभनीय फोटो
- कोरिओग्राफर आणि अभिनेता प्रभुदेवा चढणार दुसऱ्यांदा बोहल्यावर !
- आमिर खानची फजिती : जायचं होतं फडणवीसांच्या दारी, पोहचले अशोक चव्हाणांच्या घरी !
- पार्सल कोल्हापूरवरून आलं काय किंवा सांगलीवरून आलं काय, ते व्हाया पुणेच दिल्लीला जातं– गिरीश बापट
- राऊतांनी थातुरमातूर न बोलता सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत – राम कदम


