मुंबई– सिनेसृष्टी आणि त्यांचे नातेसंबंध नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतो. सध्या अशीच चर्चा सुरू आहे ती कोरिओग्राफर आणि अभिनेता प्रभुदेवा प्रभू देवा दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. ग्रुप डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रभू देवाचं नाव आज जगातील टॉप कोरिओग्राफर्समध्ये घेतलं जातं. याशिवाय तो उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शकही आहे.
प्रभू देवा लवकरच दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची सध्या इण्टरनेटवर चर्चा आहे. काही वर्षांपूर्वी प्रभू देवाने पत्नी रामलता यांना घटस्फोट दिला होता. दोघांमध्ये अनेक वर्ष वाद सुरू होते. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता प्रभू देवा आपल्या भाचीसोबत रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशा चर्चा असल्या तरी प्रभू देवा किंवा त्याच्या टीमकडून या अहवालावर अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.
प्रभू देवा सध्या सलमान खानच्या ‘राधे: यूवर मोस्ट वॉण्टेड भाई’ सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय अनेक तमिळ सिनेमांमध्ये तो मुख्य भूमिकेतही दिसणार आहे. अभिनेता म्हणून ‘पोन मनिकवेल’ हा प्रभू देवाचा ५० वा सिनेमा असणार आहे. या सिनेमात तो पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसेल. काही वर्षांपूर्वी पत्नी रामलता यांच्याशी झालेल्या वादानंतर दोघं वेगळे झाले होते. त्यांनतर प्रभू देवा आता पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “राहुल गांधी विद्यार्थ्यांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत, पण त्यांची योग्यता नाही.”- बराक ओबामा
- खोटे सोने खरे भासवून १३४ जणांनी काही कोट्यावधी रुपयांचे कर्ज उचलले; आणखी एका बँकेला गंडा!
- ‘भाजयुमो’ ची महत्वाची तिनही पदे नेत्यांच्या पुत्रांना; कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?
- ग्रामीण भागातील रस्त्यांची वाळू वाहतुकीमुळे दुरवस्था; पोपट पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
- शेतकरी विरोधी धोरणे रद्द करावीत; बलिप्रतिपदा दिनी हजारो शेतकरी पंतप्रधानांना पत्र पाठविणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

