Share

इंग्लंडच्या खेळाडूंवर होणाऱ्या वर्णभेदी टीकेवर पंतप्रधानांनी सोडलं मौन, म्हणाले…

Published On: 

मुंबई : अवघ्या क्रीडाविश्वाचे लक्ष लागुन राहिलेली युरो कप स्पर्धा ११ जुलै रोजी संपुष्टात आली. युरो कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडचा पेनल्टी शुटआऊटमध्ये ३-२ असा थरारक पराभव केला. या पराभवासह इंग्लंडचे युरोकप स्पर्धेचे जेतेपदाचे स्वप्न भंगले आहे.

या सामन्यात पेनल्टी शुटआऊटमध्ये इंग्लंडचा ३-२ असा पराभव झाला. इंग्लंडच्या पराभवानंतर चाहत्यांनी खेळाडूंवर टीका सुरु केली आहे. यात पेनल्टी मीस झालेले तीन खेळाडू प्रामुख्याने टिकेचे लक्ष्य आहे. यात तिन्ही खेळाडूंवर वर्णभेदी टीका करण्यात आली आहे. या टीकेवर इंग्लंड फुटबॉल असोसीएशनने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

तर पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी वर्णभेदी टीकेचा निषेध करत म्हणले आहे की, ‘इंग्लंडचा संघ हा अंतिम फेरीत पोहोचला. त्यामुळे मी या संघाला हिरो म्हणेन. अशा संघावर वर्णभेदी टीका चुकीची आहे. जे चाहते असं करत आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे.’ असे ते म्हणाले. युरोकपच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शुट आऊटमध्ये मार्क्स रॅशफोर्ड, जॅडॉन सँचो आणि बुकायो साका या तीन खेळाडूंनी पेनल्टी मीस केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!