औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार भागवत कराड यांना भाजपने मंत्रिपद दिले होते. यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी याचे खंडन केले असले तरी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांचा संताप दिसून आला. हे प्रकरण ताजे असतानाच पंकजा यांच्यासमोर आणखीन एक अडचण उभी राहिली आहे.
पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या बीड जिल्ह्यातील पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) औरंगाबाद विभागीय कार्यालयाने जप्त केले. त्याद्वारे ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली.
कारखान्याकडे मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या काळातील कर्मचारी व कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण १.४६ कोटी रुपये रक्कम थकीत होती. औरंगाबादच्या ईपीएफओ कार्यालयाने या वर्षातील सर्वात मोठी कारवाई करत कारखान्याचे बँक खाते जप्त करून ९२ लाखांची वसुली केली.
उर्वरित ५६ लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरू आहे.
वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन
तब्बल १९ महिन्याचे वेतन मिळाले नाही म्हणून दहा दिवसात वेतनाचा प्रश्न सोडवा, नाहीतर कारखाना बंद करू असा इशारा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी दिला होता. मात्र दहा दिवस संपल्यानंतर ही पेमेंट न मिळाल्याने अखेर कामगारांनी १० मार्च, २०२१ रोजी साखर कारखाना बंद ठेवत निषेध नोंदवला होता. त्यावेळी हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते.
महत्वाच्या बातम्या
- पंत पाठोपाठ ‘या’ महत्वाच्या खेळाडूलाही कोरोनाची लागण
- चहल-कुलुदीपची धमाल मस्ती, बीसीसीआयने शेअर केला मजेशीर व्हिडिओ
- रिषभ पंतची जागा सांभाळणार टीम इंडियाचा ‘हा’ प्रमुख खेळाडू
- ‘मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल’ ; भाजपचा विश्वास
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

