Share

दादांच्या दौऱ्याला दांडी, ताई पुन्हा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण; पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर

Published On: 

बीड : भाजपमध्ये नाराज असलेले नाराज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम-राम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. तर, उत्तर महाराष्ट्रात आता भाजपला उतरती कळा लागण्याची शक्यता असून खडसेंनी केलेल्या दाव्याप्रमाणे भाजपातील १०-१२ आमदार देखील भाजपला सोडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तर, खडसेंप्रमाणे माजी मंत्री विनोद तावडे व माजी मंत्री पंकजा मुंडे देखील नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समाविष्ट करून भाजपने नाराजी दूर केल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र, आज भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठवाड्यातील पक्षवाढीसाठी घेतलेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे गैरहजर राहिल्या आणि त्या नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं.

अशातच, शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. याआधी देखील सेना नेत्यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली होती. तर, हेमंत पाटलांसह शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पंकजांना सेनेत बोलवण्यासाठी विनंती करणार आहेत.

याप्रकरणी अखेर पंकजा मुंडे यांनी स्वतः खुलासा केला आहे.”आ. चंद्रकांत पाटील (प्रदेशाध्यक्ष भाजप) यांची व माझी दोन दिवसांपूर्वीच भेट झाली होती. यात सविस्तर चर्चाही झाली, मराठवाडयातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, याबद्दलही बोलणे झाले. ही संघटनेची आढावा बैठक होती, त्यापूर्वीच्या संध्याकाळी मी कोअर कमिटीची बैठक केली होती…दादा माझ्या घरी ७ तारखेला नाष्टा करण्यासाठी आले होते, आमच्या छान गप्पाही झाल्या.” असं ट्विट करून त्यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!