Share

बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती- पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर टीका

Published On: 

बीड : जिल्ह्यामध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहेत. त्यामुळे माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. तसेच बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांचा रोख धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

या संदर्भात पंकजा मुंडे यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आरोग्य मंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचाही समावेश आहे. तसेच पंकजा यांनी लिहिले की, ‘रेमडेसिविरचा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या २ लाख पैकी बीडला ही पुरेसे व्हॅक्सीन मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत.’

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि त्यांचा पराभव करणारे धनंजय मुंडे या दोघांमधील राजकीय संघर्ष नेहमीच पाहायला मिळतोय. कोरोनासारख्या संकटाच्या प्रसंगी देखील या पत्राच्या निमित्ताने पंकजा यांनी धनंजय यांना जोरदार टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!