मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. नुकतंच राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये पार पडले. या अधिवेशना दरम्यान 50 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली. त्याचबरोबर राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट म्हणजेच ओमायक्रॉनची देखील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्य सध्या लॉक डाऊनच्या उंबरठ्यावर आहे. त्यातच अनेक नेते, मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ताजी असतानाच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. त्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नसल्याचे पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 4 दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील धमधम इथं एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, भगवानबाबा यांच्या मंदिराचा कलशारोहणासाठी त्या हेलिकॉप्टरने धमधममध्ये पोहोचल्या होत्या. या कार्यक्रमात भाषण केल्यानंतर त्यांनी जोरात भूक लागल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. तसंच आपण कुठल्या बंद खोलीत जेवणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर उपस्थित लोकांसोबतच त्यांना स्टेजवर जेवण वाढण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
- “मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर 5 वर्षे काहीच बोलत नाहीत”
- राज्यात लॉकडाऊन होणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
- तुम्ही हर्बल वनस्पती किंवा क्रुझ पार्टीत ड्रग्ज घेऊन तर…; मुनगंटीवारांचा पवार, परबांवर निशाणा
- जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर ‘त्या’ मिम जोरदार चर्चा
- ‘बळीराजाचा विकास आणि उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध’


