Share

तुम्ही जरी उभं राहिलात तरी परळीत कमळचं फुलणार, पंकजा मुंडेंचे पवारांना आव्हान

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसने बीडमधून राजकारणाला सुरुवात केली. तसेच बीड जिल्ह्यातले उमेदवारही घोषित केले. मात्र खुद्द शरद पवार जरी स्वत: बीडमधून उभे राहिले तरी कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना आव्हान केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज नशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित समारोप झाला.यावेळी नाशिकमधील सभेला मोठी गर्दी होती. यावेळी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला आगामी निवडणुकांची अजिबात धास्ती नसून आमच्या विरोधकांनीच त्याची धास्ती घेतली आहे. परळी विधानसभेतून माझाच विजय होणार आहे. खुद्द शरद पवार जरी स्वत: बीडमधून उभे राहिले तरी कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. तसेच गेल्या 5 वर्षात मोठा विकास निधी मतदारसंघात आणला असून जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे परळीतून यंदाही मीच विजयी होणार, असा विश्वास पंकजा यांनी बोलू दाखवला.

दरम्यान मोदी हे गोरगरिबांचे स्वप्न आहे. राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस ला नेस्तनाबूत करण्याचा निर्धार करावा. जातीपातीचे विष महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने पेरलं. पंतप्रधान मोदींनी सामाजिक स्वच्छतेचं काम करत आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यावेळी उपस्थितांना संबोधित करताना देशातील सर्व विषयांवर भाष्य केले. राज्यात पुन्हा स्थिर सरकार आणायचे असेल तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा निवडून द्या, असेही मोदी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!