🕒 1 min read
औरंगाबाद : सिडकोतील प्रियदर्शिनी उद्यानात मनपाच्या वतीने उभारण्यात येणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम तूर्त ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे सोमवारी दिले. या उद्यानातील अनेक झाडे तोडून स्मारक उभारण्याची मनपाची योजना आहे. मात्र कोर्टाने याबाबत फटकारल्यानंतर मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी लगेचच प्रियदर्शिनी उद्यानाची पाहणी केली. आणि आज (दि.२५) याठिकाणी भारतीय वंशाच्या एकूण ३५० झाडांची लागवड करण्यात आली.
प्रियदर्शिनी उद्यान सिडकोने २०१६ मध्ये महापालिकेकडे हस्तांतरित केले. मनपाने तेथे ठाकरे स्मारक उभारण्याची योजना तयार केली. मात्र शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या उद्यानातील झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. २०१९ मध्ये योगेश बाळसाखरे व सोमनाथ कराळे यांनी अॅड. सनी खिंवसरा यांच्यामार्फत वृक्षतोड रोखण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती.
शहरातील ऑक्सिजनची गरज या उद्यानामुळे पूर्ण होत आहे. इंटरनॅशनल सर्व्हे ऑफ एन्व्हायरमेंट यांनी केलेल्या सर्वेक्षणात प्रियदर्शिनी उद्यान परिसरात शहराच्या इतर भागांच्या तुलनेत सर्वात कमी प्रदूषण असल्याचेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे येथील झाडे तोडू नयेत, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. २०१६ मध्ये प्रियदर्शनी उद्यानात ९८८५ झाडे असल्याची नोंद होती. मनपाने १० ऑक्टोबर २०१९ रोजी खंडपीठात दिलेल्या शपथपत्रात ८६७० झाडे असल्याचे नमूद केले होते.
स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन यासाठी प्रस्तावित प्रियदर्शिनी उद्यान सहा महिन्यानंतर शहराचे ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार यांनी यावेळी व्यक्त केले. प्रियदर्शिनी उद्यानात एकही झाड ना कापता येथे स्व बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन विकसित केले जाईल.
आज वृक्षारोपण करताना पक्ष्यांचे आकर्षित करणारे झाडे लावण्यात आले आहेत. वृक्ष वाढी सोबतच उद्यानाची जैवविविधता देखील वाढणे गरजेचे आहे, यासाठी येणाऱ्या काळात या ठिकाणी पक्ष्यांना आकर्षित करणारे झाडे जसे आंबा, जांभूळ, वड, उंबर, पिंपळ, चिंच या बहुवार्षिक झाडांची लागवड करण्याचा मानस असल्याचे पांडेय यांनी सांगितले.
सहा महिन्यांचा काळात ही जागा झाडांनी गजबजलेली आणि जैवविविधताने भरपूर करण्याचा आमचा मानस आहे. आज (दि.२५) प्रियदर्शिनी उद्यानात पांडेय तसेच शहरातल्या पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी भारतीय वंशाच्या एकूण ३५० झाडांची लागवड करण्यात आली. झाडे न तोडण्याचा दिलेला शब्द पांडेय पाळतात का हे येणारा काळच ठरवेल.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकसंख्या वाढविणे हे मर्दानगीचे काम आहे,ज्याच्यामध्ये दम असेल ते वाढवू शकतात – अख्तरुल इमान
- भीक नको पण कुत्रं आवर, गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला
- फुलंब्री-औरंगाबाद-सिल्लोड-खुलताबाद रोडवर वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
- विषय हार्ड : पहिल्याच षटकात अक्षर पटेलने इंग्लंडच्या दोन फलंदाजांना धाडलं माघारी !
- विषय हार्ड : पहिल्याच षटकात अक्षर पटेलने इंग्लंडच्या दोन फलंदाजांना धाडलं माघारी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
